Tuesday, 30 April 2019

माझी आई नेहमी म्हणायची "जोपर्यंत तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीस, तोपर्यंत लग्नाच्या बंधनात नको अडकूस" : सोनाली बेंद्रे


सुष्मिता सेन आणि सोनम कपूर नंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे  यांना 'आय एम वुमन' पुरस्काराने सन्मानित केले गेले

हार्वर्ड आणि आयई बिझिनेस विद्यापीठाचे माजी विद्यार्थी करण गुप्ता यांनी सुरू केलेल्या विशेष महिला पुरस्काराने स्त्रीला वेगवेगळ्या स्तरावरच्या उपलब्धिसाठी सन्मानित करून त्यांचे यश साजरे केले जाते.  मागील चार वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. हा कार्यक्रम एक अशी मोहिम आहे जी स्त्रियांना अमाप शक्तीचा स्तोत्र मानते. दरवर्षी, शक्तिशाली महिला त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल बोलतात ज्याद्वारे इतर महिलांना तसेच अन्य व्यक्तींना ही प्रेरणा मिळते.

या चौथ्या आवृत्तीत, 'आय एम महिला' पुरस्काराने पुन्हा एकदा त्यांच्या विलक्षण कार्यासाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील नवीन भूमिका सहजरित्या साध्य करण्यासाठी त्या महिलांना सन्मानित केले गेले. अभिनेत्री व लेखिका सोनाली बेंद्रे, उद्योजिका आणि डिझायनर नीता लुल्ला, सामाजिक कार्यकर्ता डॉ सिंधुताई सकपाळ, इन्फोसिस लर्निंग हेड किशोर गुप्ता, जेनेसिस सह-संस्थापक दीपिका गेहानी, लेखक प्रिया कुमार, मानवाधिकार कार्यकर्ती-वकील दीपिका सिंग राजवत आणि सामाजिक कार्यकर्ती निहारी मण्डली ह्यांची नावे समाविष्ट होती. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मानसी जोशी रॉय आणि गायिका मानसी स्कॉट यांनी केले ज्यात अभिनेता-निर्देशक रोहित रॉय, तनुज विरवानी आणि परवीन डबास ने त्यांना साहाय्य केले.  या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभास जायेद खान, सुलेमान मर्चंट, आरती, कैलाश सुरेंद्रनाथ आणि संदीप सोपारकर यांचीही उपस्थिती लाभली. २०१७ साली 'आय एम् वूमन' पुरस्काराच्या मानकरी  ठरलेल्या क्रिषिका लुल्लाआणि २०१६ च्या 'आय एम वुमेन' पुरस्काराच्या विजेत्या किरण बावा, महेका मीरपुरी आणि रेशमा मर्चेंट देखील उपस्थित होत्या. 

या वर्षीच्या चर्चेत महिला सशक्तीकरण व्यवसाय कसे सक्षम करावे आणि ते एकत्रितपणे त्याच्या आपल्या समाजाला कशी मदत होईल आणि एक सकारात्मक प्रभाव निर्माण करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.

न्यूयॉर्कमध्ये उच्च श्रेणीच्या कर्करोगावर उपचार घेऊन नुकत्याच भारतात त्यांच्या कर्मभूमीत परतलेल्या सोनाली बेंद्रे म्हणतात, "माझी आई मला नेहमी म्हणायची आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत लग्न करू नये. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यास आपण पुन्हा स्वत: साठी उभे राहू शकणार नाही, त्यानंतर आपल्यावर अवलंबून असते की आपण पुढच्या दिवशी पराभव स्विकारातो की नाही. ही एक वेगळी गोष्ट आहे. पण ही तुमची निवड आहे. परंतु आपण स्वत: एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्यक्ती होण्याची सुरुवात केलीच पाहिजे. तेव्हाच आपल्या प्रत्येक नातेसंबंधांमध्ये समानता येऊ शकेल. " 

सोनाली ज्या खूप उत्साही होत्या पुढे म्हणालया, "मला नेहमीच पुरस्कार आणि बक्षीस आवडतात, परंतु या सन्मानासाठी माझ्या मनात एक वेगळे स्थान आहे. मला वाटते की करण गुप्ता एजुकेशन फाउंडेशन ही महिलांसाठी कार्य करत आहेत. या कारणाने हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे. "

 यावर्षी  इतर पुरस्कार विजेत्यांनीही त्यांचा विचार आणि आनंद व्यक्त केला. गेल्यावर्षी २०१८ मध्ये,  'आय एम वुमन' पुरस्काराने अभिनेत्री सुष्मिता सेन,  टाटा ग्रुप च्या उद्योजिका लीह टाटा, अभिनेत्री आणि आरजे मलिष्का मेंडोंसा, सामाजिक कार्यकर्त्ता ज्योति ढवळे आणि  प्रीति श्रीनिवासन, वकील आभा सिंह, कलाकार आणि परोपकारी व्यक्तिमत्वव मिशेल पूनावाला, इंटरनॅशनल डिज़ाइनर फाल्गुनी शेन पीकॉक, उद्योजिका भावना जसरा यांना सन्मानित केले होते.  त्यापूर्वी २०१७ सालामध्ये अमृता फडणवीस, लक्ष्मी अग्रवाल, गौरी सावंत, फराह खान अली, मालिनी अग्रवाल, शाहिन मिस्त्री आणि क्रिशिका लुल्ला यांना पुरस्कार देण्यात आला होता, तर २०१६ साली ह्या पुरस्काराजाच्या मानकरी ठरल्या अभिनेत्री सोनम कपूर, रेशमा मर्चेंट,‌ महेका मीरपुरी, रौनक रॉय, देविता सराफ, किरण बावा, निशा जामवाल, अमृता रायचंद, रूबल नागी आणि लकी मोराणी.

करण गुप्ता सांगतात की, "आयई बिझिनेस स्कूल आणि केजीईएफ सक्रियपणे महिलांना व्यवसायात मदत करतात आणि त्यांना विशेष शिष्यवृत्ती देतात. आम्हाला माहिती आहे की महिलांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते म्हणूनच आम्ही त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो." 

अखेरीस, 70 च्या दशकातील प्रसिद्ध इंग्रजी गाणे आठवते, ज्याचे बोल काही असे होते ... 'आई एम अ वूमन... हियर मी रोर, इन नंबर्स टू बिग टू इग्नोर. इफ़ आई हैव टू, आई कैन डू एनिथिंग. आई एम स्ट्रॉन्ग, आई एम इनविंसिबल, आय एम अ वूमन'.

Thursday, 11 April 2019

Writer-Director-Animal Rights and Gender Activist Anusha Srinivasan Iyer,
Audiologist-Speech Therapist-Philanthropist Devangi Dalal and
 Filmmaker Dr. Aleena Khan felicitated with the Garnet & Gold Women of Influence Awards.

Tuesday, 9 April 2019

Singer-Performer Lalitya Munshaw makes waves

Born to connoisseur parents with strong musical beliefs deep in her family, Lalitya Munshaw grew up to become an artiste with clear inclinations towards music. Lalitya is now a seasoned artiste who has performed across the national and international circuits.
                              
Laitya has received extensive formal training in Hindustani classical music which led her to an Alankar (M.A.) in music. Blessed with a melodious and serene voice, she has developed her own
Lalitya Munshaw
expressive and unique style over time. With a strong background in classical training, she forayed into several genres of music such as Fusion, Bollywood, Bhajans, Ghazals, Sufi and Folk.
                                                                                   
As a live performer and recording artiste, Lalitya Munshaw has had the privilege of working with stalwarts like Hariharan, Sonu Nigam, Arijit Singh, Shaan, Ustd. Rashid Khan, Ustd. Sultan Khan, Anup Jalota, Louis Banks, Ronu Majumdar, Neeladri Kumar, Karsh Kale, Prem Joshua and Abhujit Pohankar.
                                     
As an entrepreneur, Lalitya Munshaw runs a music label of her own called Red Ribbon.

Lalitya has to her credit, accolades and awards of the likes of the Pandit Omkarnath Thakur Trophy, the GINFS Nav Shakti Gurjari Award, FICCI Flow Award, GCCI Award (2011), Business & Entertainment Global Award to her label, Red Ribbon; the 6th Gauravvanta Gujarati Award by Gujarat Tourism (2013); and the Gratitude Award among many others

Friday, 5 April 2019

Sushant Divgikar aka Rani Ko-He-Nur launches Love Is Love, India's first Pride Anthem

Sushant Divgikar, former Mr. Gay India 2014, features in a single "Love is Love", a pride anthem by Swedish artiste Petter Wallenberg, founder of international LGBTQIA organization Rainbow Riots

'Love is Love’, features India’s first openly gay celebrity and drag queen, Sushant Divgikar. ”Love is Love” is India’s first Pride anthem, a mix of classic Western dance music with both English and Hindi lyrics.  Divgikar, former Bigg Boss contestant will be out on iTunes, Spotify and all major digital platforms worldwide on April 2nd.

“The single ‘Love is Love’ speaks about equal love, about being true to one’s authentic self,” Sushant Divgikar said. 
Sushant Divgikar at the media meet of
 Love Is Love at The Lalit

Model, VJ, reality show participant, actor, singer, and now drag queen—Sushant Divgikar wears many hats. The 27-year-old, hailing from Mumbai, debuted as a drag queen in Delhi in September.

“This track is very close to my heart and spreads the message that love always wins. This is a great time for this anthem to be introduced to the world and a new India that finally allows people to love freely and without fear.” added the former "Bigg Boss" contestant.

After scrapping of Section 377, India is slowly moving into a space of acceptance and inclusion, making all love legal. Sushant Divgikar as an LGBTQIA flag-bearer has showcased himself with belief. Sushant Divgikar has found himself a place internationally with, Rani-Ko-He-Nur his drag avatar.

This outstanding participant in a music reality show 'Sa Re Ga Ma Pa,' has been a passionate singer since he was a 16-year-old.. His hard-work has led him to showcase his talent on television. Sushant started out with ads, progressed to TV shows, and gradually ventured into singing in both male and female voices.

He made this journey because of his honesty to himself. In an interview Sushant said, “I did face some challenges, given my orientation. I have done TV shows where people have not been friendly. But there are also those who don’t give a damn as long as the work is getting done. I was lucky to have these people supporting me”.