Friday, 19 July 2019

मुश्किल - फियर बिहाइंड यु सिनेमाचे नवीन गाणे आऊट! रजनीश दुग्गल, कुणाल रॉय कपूर, रविंदर जीत दारिया, मोहंमद इरफान, राजीव एस रुईया आणि अन्य कलाकारांच्या उपस्थितीत रंगला गाण्याच्या अनावरणाचा कार्यक्रम.

 
अंधेरी पश्चिम येथील 'द व्ह्यू' मध्ये 'मुश्किल - फियर बिहाइंड यु' ह्या आगामी चित्रपटाचे नवीन गाणे लाँच करण्यात आले. यावेळी सिनेमाचे निर्माते रविंदर जीत दारिया, दिग्दर्शक राजीव एस रुईया, स्टारकास्ट  रजनीश दुग्गल, कुणाल रॉय कपूर, पूजा बिश्त, नाझिया हुसैन आणि  शफाक नाझ, गायक मोहम्मद इरफान आणि संगीत दिग्दर्शक वर्दन सिंग उपस्थित होते. ह्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने चित्रपटाचे पहिले गाणे 'इक सिवा तेरे' लाँच करण्यात आले. ह्या गीताचे गायक आहेत मोहम्मद इरफ़ान आणि ह्याला स्वरबद्ध केले आहे वर्दन सिंग यांनी. गाण्याच्या लाँच नंतर चित्रपटाच्या कास्ट आणि  क्रू बरोबर एक प्रेस कॉन्फरन्स पार पडली. 


राजीव रुईया यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या  चित्रपटाची निर्मिती केली आहे रविंदर जीत दारिया आणि बिग बॅट फिल्मस यांनी. 'मुश्किल - फियर बिहाइंड यु' ही गोष्ट चार मित्रांची आहे जे प्रवेश बंद असलेल्या  किल्ल्यात प्रवेश करतात. सार्वभौमिक सत्य मानलं जात की, चांगुलपणा नेहमीच वाईट गोष्टीवर भारी पडतो. 'मुश्क़िल - फ़ियर बिहाइंड यू' चित्रपट नेहमीच चांगुलपणाचा कसा विजय होतो हे सिद्ध करते. 

प्रेस कॉन्फरन्स दरम्यान निर्माता रविंदर जीत दारिया म्हणाले की, "मुश्किल हा एक असा प्रयत्न आहे ज्यात गरजेनुसार खर्च केला गेला आहे, ह्या मागे आमचा एक चांगला मनोरंजक चित्रपट बनविणे हा एकच प्रामाणिक उद्देश होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण ग्रीस, युरोप आणि बनारस सारख्या ठिकाणी करण्यात आले आहे. दिग्दर्शक राजीव रुईया आणि संपूर्ण कास्टने उत्तमरित्या काम केले आहे." 

रजनीश दुग्गल सांगतात की, "ह्या चित्रपटातील माझे पात्र बहुरंगीत व मनोरंजक आहे. जेव्हा मला ही गोष्ट सांगितली गेली त्यावेळी मी ही प्रभावित झालो होतो." 

कुणाल रॉय कपूर म्हणाले, “मुश्किल ने मला अशी संधी दिली जी ह्यापूर्वी मला कधीच मिळाली नव्हती. पहिल्यांदा मी एका गाण्यावर परफॉर्म केले आहे. हा चित्रपट करतानाच प्रत्येक क्षण मला अगदी प्रिय आहे. हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता आणि पुढेही असेल."

शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, "हॉरर ही एक अशी शैली आहे जिथे आपल्याकडे सर्जनशीलता भरपूर प्रमाणात करण्याची संधी असते. ही कथा जुन्या रूढी आणि आधुनिक जगाचे मिश्रण आहे. 'मुश्किल' चित्रपटाची मोठी यूएसपी म्हणजे कलाकारांचा दर्जेदार परफॉर्मन्स, वीएफक्स, उत्तम गाणी आणि त्या गाण्यांना स्वरबद्ध केलेले गायकांचे सुंदर आवाज हे चित्रपटाला आणखी मनोरंजकपूर्ण बनवतात. हे सगळे शक्य झाले आमच्या निर्मात्याच्या पाठिंब्यामुळे."

 'मुश्किल - फियर बिहाइंड यु' हा चित्रपट ९ऑगस्ट २०१९ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. 

No comments:

Post a Comment